गरवारे कम्युनिटी सेंटर, गरवारे बाल भवन, छत्रपती संभाजी नगर जिल्हा योग संघटना आणि राधेश्याम एज्युसोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...भव्य सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धा - 2026
सप्रेम नमस्कार, आम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, योगासने आणि सुदृढ आरोग्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर सिडको तसेच वाळूज येथे भव्य 'सांघिक सूर्यनमस्कार' स्पर्धांचे (१ ली ते ४ तसेच ५वी ते९ वी)आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक: 11,12,13,14 फेब्रुवारी 2026
🕘 वेळ: सकाळी ठीक 9:00 वाजता स्पर्धा संपन्न झाल्या.
📍 स्थळ: गरवारे कम्युनिटी सेंटर, एन-7, सिडको, गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूज, हनुमान मंदिर वाळूज छत्रपती संभाजीनगर.
वाळूज व सिडको मिळून दोन हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
आयोजक:
१. गरवारे कम्युनिटी सेंटर
२. छत्रपती संभाजी नगर जिल्हा योग संघटना
३. राधेश्याम एज्युसोशल फाउंडेशन
राधेशाम एज्युसोशल फाउंडेशन तथा विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थांच्या वतीने संस्थेच्या कार्यात सक्रिय असलेल्या प्रतिनिधींच्या मुला-मुलींना जे दहावी किंवा बारावी इयत्तेत शिकत आहेत त्यांना परीक्षे निमित्त प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात आल्या.
भेट संचात पुढील बाबी आहेत:
👉🏽परीक्षे पूर्वीची तयारी, परीक्षा सभागृहात करायची तयारी, विविध विषयांच्या आदर्श उत्तरपत्रिका कश्या असाव्यात?? याबद्दल मार्गदर्शक पत्रक या संचात आहे तसेच सुंदर असा पेन देखील आहे.
👉🏽 अमृत परिवार संकल्पना मांडलेले पत्रक यात आहे.
👉🏽 मराठी भाषेला मिळालेला अभिजात राजभाषा हा दर्जा मिळाल्या बद्दल कुटुंबातील प्रत्येकाने जीवन उपयोगी अश्या सत्तावीस विषयांवरील मार्गदर्शक असलेल्या एक ओवी जीवन घडवी या पुस्तकातील नित्य एक ओवी अर्थासह लिहून काढण्याचे आवाहन पत्रक पुस्तकासह यात आहे.
👉🏽 समर्थांचे व्यवस्थापन याविषयी चे एक रंगीत पत्रक देखील यात समाविष्ट आहे.
स्वसंरक्षण (नियुद्ध) कार्यशाळा
नियुद्ध म्हणजे निशस्त्र युद्ध..... कोणत्याही प्रकारचे शस्त्र अस्त्र न वापरता फक्त हात आणि पाय यांचा उपयोग करून समोरच्याला कमीत कमी इजा करून स्वतःचे रक्षण करणे म्हणजे नियुद्ध...
👉🏽आजच्या धावपळीच्या आणि असुरक्षित वातावरणात नियुद्ध ही केवळ युद्ध कला नसून जीवन जगण्याची कला आहे. युवक युवतींनी नियुद्ध शिकल्यास ते शारीरिक दृष्ट्या सक्षम , मानसिक दृष्ट्या स्थिर आणि सामाजिक दृष्ट्या जबाबदार नागरिक बनू शकतात.
👉🏽स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त. नियुद्ध हे स्त्रियांना कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे रक्षण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बलापेक्षा तंत्र, वेळ आणि अचूक हालचालींवर आधारित असल्याने हे अधिक प्रभावी ठरते.
👉🏽पारंपरिक भारतीय वारश्याचे जतन - नियुद्ध ही भारताची प्राचीन युद्धकला आहे. ती शिकणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभिमान जपणे होय.
२५ जानेवारीला (रविवारी) राधेशाम एज्युसोशल फाउंडेशनच्या वतीने वय वर्षे 13 ते 45 वर्षे या वयोगटासाठी स्वसंरक्षणासाठी नियुद्ध कार्यशाळा संपन्न झाली.
छत्रपती संभाजीनगर मधील विविध भागातून सुमारे ७८ युवा किशोर यांनी सहभाग नोंदवला. राधेशाम फाउंडेशनच्या २७ प्रतिनिधींनी यासाठी विशेष मेहनत घेतली.
कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी श्री दयाल सिंग, सौ उर्मिलाजी उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून गरवारे कम्युनिटी सेंटर चे संचालक श्री सुनीलजी सुतवणे होते तसेच श्री गणेश व सौ प्रविणा खुदभैय्ये उपस्थित होते.
कळंब्याची रामघळ किंवा तोंडोशीची समर्थगुंफा
"खनाळामध्ये जाऊनी राहे। तेथे कोणीच न पाहे। सर्वत्रांची चिंता वाहे । सर्व काळ ॥"
"दरे दर्कुटे कडे कपाटे । पाहो जाता भयची वाटे । परी ऐसे स्थळी वैभव दाटे। देणे रघुनाथाचे ॥"
२७ सप्टेंबर २०२५ शनिवार (जागतिक पर्यटन दिन) सकाळी ६ वाजता पुण्यात व सर्वत्र वरुणराजांनी मुसळधार वर्षाव केलेला असतानाही समर्थ रामदास स्वामींना साक्षी ठेवून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निसर्गरम्य आणि बहुतांश जणांना अपरिचित अशा तोंडोशीच्या रामघळीला समर्थ भक्तांना घेऊन जाण्याचा निर्णय ओंकार दादांनी घेतला.
जवळपास महिनाभर अचूक नियोजन सुरू होते. नवरात्रीचा सण सुरू असतानाही १८ जणांनी येण्याचे निश्चित केले. वाहनाची व्यवस्था करण्यात आली. उशिरा नोंदणी करणाऱ्यांना नियोजनात अडचण येऊ नये म्हणून पुढील वेळेस नक्की प्रयत्न करू या आश्वासनासह थांबावे लागले.
👉🏽 समर्थ भक्तांना समर्थांच्या साधनास्थानी नेण्यासाठी जे अचूक नियोजन आवश्यक असते त्याची प्रचिती प्रत्येकाला आली. प्रस्थान स्थळ, वेळ, आवश्यक वस्तूंची यादी, औषध व पावसाळी सूचना यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
तोंडोशीची रामघळ सहल
प्रस्थान :- धन्वंतरी सभागृह, पटवर्धन बाग, पुणे
प्रस्थान वेळ - सकाळी ७.०० वाजता
कार्यक्रम रूपरेखा :
१) न्याहारी व चहापान (सुरुर)
२) तोंडोशी रामघळीचे दर्शन
३) दुपारचे जेवण (घळीत)
४) चहापान
५) धन्वंतरी सभागृह येथे सांगता
👉🏽 तीन-चार दिवस आधी नाश्त्याचा विस्तृत मेनू देण्यात आला. निवडलेला नाश्ता व पेय हॉटेलमध्ये पोहोचताच चार मिनिटांत मिळाल्याने वेळेची बचत झाली.
👉🏽 साताऱ्याहून तारळ खोऱ्यातील मुरुड गाव, काळगंगेचा पूल ओलांडून तोंडोशी वस्तीवर आगमन झाले.
👉🏽 सुंदर वनसंपदा, धरण, धबधबे यांचे दर्शन घेत कळंब्याच्या डोंगरावरून पुन्हा तोंडोशीकडे येत डोंगरी पायवाटेने सत्तरी गाठलेले ज्येष्ठ तसेच तरुण, किशोर, प्रौढ समर्थ भक्त पावसाचा आनंद घेत जय जय रघुवीर समर्थ घोष करत पुढे निघाले.
👉🏽 “पसरले सरले गिरि साजरे...” अशा निसर्गवर्णनाचा अनुभव घेत सर्वजण घळीच्या दिशेने प्रगती करत होते.
👉🏽 दोन-तीन प्रचंड धबधब्यांचा रौद्ररम्य नजारा दिसला. त्या धबधब्याआड समर्थांची रामघळ जणू हात पसरून खुणावत होती — “या माझ्या समर्थांच्या लेकरांनो...” असा आत्मीय अनुभव सर्वांना आला.
👉🏽 घळीत पोहोचताच मन शांत झाले. रामराय व गणरायांची आरती झाली. ओंकार दादांनी श्रीमद दासबोधातील सद्गुरु स्तवन सादर केले. जणू समर्थशिष्यांचा इतिहास पुन्हा उजळला.
👉🏽 ‘रामदासांच्या निसर्गरम्य घळी’ या पुस्तकाचे लेखक श्री दिलीप पांगारकर लिहितात की शके १५६६ साली मसूर येथे श्रीरामनवमी उत्सव सुरू केला. त्या काळात समर्थांचे वास्तव्य मुख्यतः याच घळीत होते. तारळे गाव छत्रपती शिवरायांच्या जावई राजे महाडिक यांचे गाव म्हणून ओळखले जाते.
👉🏽 घळ सोडताना प्रपंचाची आठवण झाली. उपवास करणाऱ्यांसाठी रताळ्याचा किस, काकडी कोशिंबीर, आमरस; इतरांसाठी कोबी भाजी, पुलाव, पोळ्या, आमरस असा प्रसाद मिळाला.
👉🏽 सर्वांनी घळ स्वच्छ करून खाली प्रस्थान केले.
एक गुपित स्थळ भेट
👉🏽 ओंकार दादांनी डोळेगाव येथे समर्थ स्थापित मारुती मंदिर दाखवले. दगडी मंदिर जमिनीत धसलेले दिसले; मात्र मारुतीरायांची मूर्ती तात्पुरत्या मंदिरात सुरक्षित स्थापित केलेली होती.
👉🏽 श्रद्धेय सुनीलदादांच्या ‘चिंता करतो विश्वाची’ पुस्तकाचा संदर्भ देत माहिती दिली की सज्जनगडावर जाण्यापूर्वी समर्थ येथे निवास करत असत. हे मारुती समर्थ स्थापित असून अकरा मारुतींपेक्षा निराळे आहेत.
👉🏽 या मारुतीरायांना सिंदूराऐवजी भाजलेल्या खोबऱ्यात तेल कालवून काळा लेप लावला जातो. मूर्तीची मान तिरकी आहे — समर्थांनी सज्जनगडावर जाण्यापूर्वी अनुमती मागितली तेव्हा मारुतीरायांनी मान डोलावली अशी श्रद्धा आहे.
👉🏽 हा अद्भुत अनुभव मनात साठवून सर्वजण पुण्याकडे निघाले. परतीच्या प्रवासात चहापान व परिचय सत्र झाले.
👉🏽 श्री सचिन दादा रामदासी यांच्या कन्या कु. सौम्या हिला CET मध्ये 99.54% गुण मिळाल्याबद्दल राधेशाम एज्युसोशल फाउंडेशनतर्फे गौरवपत्र व पुरस्कार आदरणीय ओंकार दादा नेरलेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अशा प्रकारे समर्थ विचारांची व स्मृतींची शिदोरी मनात साठवत सर्वजण धन्य होत पुण्यात परतले.
जय जय रघुवीर समर्थ
1. पुण्याच्या सौ. स्वप्ना देशपांडे यांनी (२०२३-२४) मागे चार महिने वीस दिवस चालून नर्मदामातेची परिक्रमा पूर्ण केली. मंथन सत्रात *तुमचा प्रवासाचा वेळ वापरा* या संदेशावर चिंतन होऊन मग सौ. स्वप्ना यांचे अनुभव कथन झाले.
2. आधी नर्मदा माता महात्म्य, परिक्रमा महात्म्य, त्याचे शास्त्रीय संदर्भ व कथा यांचे उत्तम विवेचन सौ. स्वप्ना यांनी दिले. एक आदिशक्ती एकटी चार महिने वीस दिवस नर्मदा माता परिक्रमा करते — निर्जन रस्ते, श्वापदे असलेले जंगल, नित्य खाण्या-पिण्याची व निवासाची अनिश्चित व्यवस्था, जवळ पैसे नाहीत; तीन-चार वेळा गायीच्या गोठ्यात गायी शेजारी झोपावे लागले; पंधरा दिवस पोटभर अन्न मिळाले नाही; रस्ता योग्य आहे की नाही हेही कधी कधी कळेना. निर्मनुष्य रस्त्यांवर नर्मदा मातेला विनवले की कोणी ना कोणी अचानक येऊन मार्ग दाखवी. दोन पितृतुल्य व्यक्तींची अचानक भेट झाली व परिक्रमा पूर्ण होईपर्यंत साथ लाभली. स्नान, जेवण, झोप, चालणे सर्वच कठीण. सुखसोयींमध्ये राहणारी व्यक्ती — पण आई, पती, मुलगा यांची अनुमती आवश्यक; ओंकारेश्वर येथे कुमारिका पूजन, नर्मदा माता पूजन, ओम आकार पर्वतास तीन प्रदक्षिणा, पांढरे वस्त्र, हातात कमंडलू व काठी, पाठीवर १४-१५ किलोची बॅग (झोपायचा फट्टा, पांघरूण, अतिरिक्त वस्त्र) घेऊन प्रवास. खडकाळ, चिखल, डोंगर-दऱ्या, जंगल, कडाक्याची थंडी, पाऊस, कडक ऊन — ओझे शरीराचा भाग समजून चालायचे. आजारपण आले तरी संकल्प पायी चालण्याचा; नर्मदा तट उल्लंघन नाही. नित्य उपासना, आरती, जप; साधू-महंतांची भेट; रुद्राक्ष आदी प्रसाद. एका महंतांनी सुजलेल्या पायावर पाला व मंत्रोच्चार करून सूज उतरवली — तपशक्तीचे सामर्थ्य अनुभवले.
3. आजोबांच्या इच्छेखातर एक दहावीत शिकणारी वनवासी कन्या दिवसभर परिक्रमावासीयांना चुलीवर स्वयंपाक करून जेवू घालत असे आणि रात्री कंदिलाच्या उजेडात अभ्यास करीत असे.
4. एका निर्जन भागातील वनवासी स्त्रीकडे अठरा विश्व दारिद्र्य असूनही मनाचा मोठेपणा सागरासारखा; स्वतःला खायला नसताना घरातील एकमेव बकरीचे दूध काढून सौ. स्वप्ना यांना दिले.
5. एका गावातील सत्तर वर्षीय निरक्षर आजोबा रात्री दिव्याच्या प्रकाशात गायत्री मंत्र लिहीत होते; वयाच्या पन्नाशीत आयुष्य वाया चालल्याची जाणीव होऊन मंत्र लिहून घेतला व नित्य तोच गिरवत व लिहीत राहिले.
6. स्त्रीला आदिशक्ती का म्हणतात याचे उदाहरण — आश्रमात शिधा मिळे; पण कधी स्टोव्हही न वापरलेल्या सौ. स्वप्ना यांनी चूल मांडणे, पेटवणे, हातावर भाकरीप्रमाणे पोळी फिरवून चुलीत भाजणे शिकले. चालून थकून आल्यावर स्वयंपाक, जेवण, नित्य उपासना, नर्मदाष्टक, आरती; जिथे जागा मिळेल तिथे विश्रांती; पहाटे चार-साडेचारला पुन्हा प्रस्थान.
7. असे अनेक अनुभव सव्वा तास सतत त्यांनी सांगितले. नर्मदा मातेच्या कुशीत अनुभवलेला मायेचा झरा आमच्यासमोर पाझरत होता आणि आम्ही सर्व मंथन श्रोते त्या पवित्र, सात्विक, वैराग्यपूर्ण ब्रह्मानुभवाच्या प्रवाहात डुंबत होतो. वेळेअभावी 10.35 वाजता सांगता झाली; भविष्यात किमान तीन तासांचे अनुभव कथन आयोजित करण्याचे ठरले. सर्वांनी नर्मदा मातेला व सौ. स्वप्ना मधील आदिशक्तीला वंदन करून दुग्धप्रसाद व श्री नांदेडकर दादांनी आणलेला पेढा प्रसाद ग्रहण केला.
8. नर्मदे हर...
राधेशाम फाउंडेशनच्या सर्व प्रमुख प्रतिनिधींशी संवाद साधून व सविस्तर चर्चा करून सूर्यनमस्कार तक्ते अंतिम रूपात तयार करण्यात आले आहेत. इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमातील विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व अभ्यासकांना या तक्त्यांचा निश्चितच उपयोग होईल.
🌸 आसन कसे करावेत याची कृती चित्रांद्वारे स्पष्टपणे दर्शवली असून त्याबाबतची माहिती मराठी व इंग्रजी भाषेत शेजारी दिली आहे.
🌸 श्वास कसा घ्यावा, केव्हा घ्यावा, केव्हा रोखून धरावा व केव्हा सोडावा याची विस्तृत माहिती आसन व श्वसन आकृती तक्त्यांद्वारे समजावून सांगितली आहे.
🌸 सूर्यनमस्कार घालताना, घालण्यापूर्वी व घातल्यानंतर म्हणावयाचे मंत्र देखील नमूद केले आहेत.
🌸 सूर्यनमस्काराचे महत्त्व व त्याचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे यांचा स्वतंत्रपणे उल्लेख करण्यात आला आहे.
🌸 सर्वात खाली या तक्त्याचे मूल्य विशेष रूपाने अधोरेखित केले आहे.
🌸 सूर्यनमस्कार या योगप्रकाराबाबत अशा प्रकारे विस्तृत माहिती मराठी व इंग्रजी भाषेतून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारी राधेशाम एज्युसोशल फाउंडेशन ही कदाचित एकमेव संस्था असावी.
हर हर महादेव
१. 10 वी,12 वी, डॉक्टर, इंजिनिअर, IIT, आर्किटेक्ट, एम.सी.ए.वकिली परीक्षा पास झालेल्या 32 यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
२. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी आदरणीय पंडित विश्वनाथ दाशरथे, प्रमुख अतिथी म्हणून खास पुण्याहून आलेल्या आदरणीय सुनीताताई चिंचोलकर, व गुवाहाटी येथे प्राध्यापक असलेल्या आदरणीय डॉ. अपर्णा ताई गोस्वामीजी होत्या.
३. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण होऊन समर्थ रामदास स्वामी रचित श्लोकाचे पठण तसेच महापुरुषांचा व भारतमातेचा जयघोष करून झाली. त्यानंतर संस्थेत कार्यरत असलेल्या लहान मुलांनी उत्कृष्ट स्फूर्तीगीत गात उत्साह वाढवला.
4. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना राधेश्याम एज्युसोशल फाउंडेशन चे प्रतिनिधी श्री मकरंद लेहकर यांनी संस्थेचा या कार्यक्रमा मागील उद्देश सांगताना सांगितले की, या सर्व विद्यार्थ्यांनी आपापले करियर करताना जिद्द, प्रमाणिक प्रयत्न व मेहनत करत अधिकाअधिक यशस्वी तर व्हावेच पण हे होताना आपला समाज, देश , संस्कार विसरता कामा नये. या सर्वांना जोडून ठेवण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून online एकत्रीकरण, तसेच करियर करत असताना त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिची भेट व मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा मानस आहे असे सांगितले.
५. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा संपन्न झाला. सन्मानित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, विविध विषयक संस्कारक्षम पुस्तके, भेटवस्तु व दंड अशी अनोखी भेट देण्यात आली.
६. सूत्रसंचालक म्हणून सौ. श्रद्धा शुक्ल व सौ. सोनाली पवार यांनी काम केले. तर सौ सुवर्णा जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
७. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व प्रतिनीधींनी महिनत घेतली. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रात काम करणारे संस्थेचे प्रतिनिधी सहपरिवार उपस्थित होते.
८. अल्पोपाहार घेऊन सर्वांना पेढे वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.
कुमार, किशोर, तरूण यांचे मन, मेंदू व मनगट बळकट व्हावे म्हणून छत्रपती शिवराय, गुरू गोविंदसिंह, समर्थ रामदास स्वामी तथा स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भारतभूमीत जन्म घेऊन संपूर्ण जीवन यासाठी अर्पित केले. या थोर विभूतींना आदर्श मानून २००५ पासून ७-८ तरूणांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रात विविध प्रकारे कार्याची सुरुवात केली. आपण करावे । करवावे । आपण विवरावे । विवरवावे । दा. १९-१०-१७ या नियमाला अनुसरून कार्य चालू झाले व आज या बीजाचे एका रोपटयात रूपांतर झाले असून "राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशन" या नावाने नोदंणीकृत संस्था म्हणुन कार्यरत आहे.
Look More