१. 10 वी,12 वी, डॉक्टर, इंजिनिअर, IIT, आर्किटेक्ट, एम.सी.ए.वकिली परीक्षा पास झालेल्या 32 यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
२. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी आदरणीय पंडित विश्वनाथ दाशरथे, प्रमुख अतिथी म्हणून खास पुण्याहून आलेल्या आदरणीय सुनीताताई चिंचोलकर, व गुवाहाटी येथे प्राध्यापक असलेल्या आदरणीय डॉ. अपर्णा ताई गोस्वामीजी होत्या.
३. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण होऊन समर्थ रामदास स्वामी रचित श्लोकाचे पठण तसेच महापुरुषांचा व भारतमातेचा जयघोष करून झाली. त्यानंतर संस्थेत कार्यरत असलेल्या लहान मुलांनी उत्कृष्ट स्फूर्तीगीत गात उत्साह वाढवला.
4. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना राधेश्याम एज्युसोशल फाउंडेशन चे प्रतिनिधी श्री मकरंद लेहकर यांनी संस्थेचा या कार्यक्रमा मागील उद्देश सांगताना सांगितले की, या सर्व विद्यार्थ्यांनी आपापले करियर करताना जिद्द, प्रमाणिक प्रयत्न व मेहनत करत अधिकाअधिक यशस्वी तर व्हावेच पण हे होताना आपला समाज, देश , संस्कार विसरता कामा नये. या सर्वांना जोडून ठेवण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून online एकत्रीकरण, तसेच करियर करत असताना त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिची भेट व मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा मानस आहे असे सांगितले.
५. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा संपन्न झाला. सन्मानित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, विविध विषयक संस्कारक्षम पुस्तके, भेटवस्तु व दंड अशी अनोखी भेट देण्यात आली.
६. सूत्रसंचालक म्हणून सौ. श्रद्धा शुक्ल व सौ. सोनाली पवार यांनी काम केले. तर सौ सुवर्णा जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
७. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व प्रतिनीधींनी महिनत घेतली. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रात काम करणारे संस्थेचे प्रतिनिधी सहपरिवार उपस्थित होते.
८. अल्पोपाहार घेऊन सर्वांना पेढे वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.
कुमार, किशोर, तरूण यांचे मन, मेंदू व मनगट बळकट व्हावे म्हणून छत्रपती शिवराय, गुरू गोविंदसिंह, समर्थ रामदास स्वामी तथा स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भारतभूमीत जन्म घेऊन संपूर्ण जीवन यासाठी अर्पित केले. या थोर विभूतींना आदर्श मानून २००५ पासून ७-८ तरूणांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रात विविध प्रकारे कार्याची सुरुवात केली. आपण करावे । करवावे । आपण विवरावे । विवरवावे । दा. १९-१०-१७ या नियमाला अनुसरून कार्य चालू झाले व आज या बीजाचे एका रोपटयात रूपांतर झाले असून "राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशन" या नावाने नोदंणीकृत संस्था म्हणुन कार्यरत आहे.
Look More